Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील विकास म्हात्रे गेट मध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.. ठाणे महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी करून योग्य त्या मोकळ्या ठीकाणी सोडावेत… योगेश निकम ठाकरेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
दिव्यातील विकास म्हात्रे प्रवेशद्वारातील परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांचे टोळके अंगावर धावून येत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातास सामोरे जावे लागण्याच्या घटना घडत आहेत. येथील परिसरातील दुचाकीचालकांत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतताना कुत्री अंगावर धाऊन येत असल्याने दुचाकीचालकांचा तोल जाऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. लहान मुलांवरही कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
म्हात्रे गेट या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची दुकाने सुरू असल्याने उरलेले अन्न ते रस्त्यावर टाकत असल्याने परिसरात भटकी कुत्री जमा होतात, त्यामुळे येथे कुत्र्यांच्या उपद्रव वाढला आहे.तसेच काही नागरिक ही कुत्र्यांना खाद्य देत असून त्यामुळे संख्या वाढत आहे व परिसरात रात्रीच्या वेळी कुत्र्यांची टोळकी नागरिकांनाच्या अंगावर येत असतात तर पाठलाग करतात. काही ठिकाणी ही कुत्री दबा धरून बसतात व अचानक दुचाकीस्वारांच्या समोर येतात. त्यामुळे गोंधळून जाऊन दुचाकीस्वारांना अपघाताच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी कुत्र्यांची झुंडच बसलेली दिसते.
ठाणे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपाययोजनांचा अभाव करणे गरजेचं आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ मिळतात, ज्यामुळे त्यांची संख्या वाढते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांना शारीरिक इजा तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी आणि रेबीज लसीकरण मोहीम राबवणे आवश्यक आहे. असे ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख योगेश निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले स्पष्ट केले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे