दिव्यातील बौद्ध समाजाचे आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असणारे सौरव आढांगळे यांना मुंबई विद्यापीठ शाहु शिक्षण संस्थेमधून पॉलिटिकल सायन्स पदवी प्राप्त….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 11 मार्च: दिवा शहरात सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असणारे सौरव आढांगळे यांना मुंबई विद्यापीठ शाहु शिक्षण संस्थेमधून पॉलिटिकल सायन्स या विषयाची पदवी मिळाली आहे.
दिवा शहरात वेळोवेळी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे. कमी वयात राजकीय वारसा नसताना वयाच्या २२ व्या वर्षी आपला ठसा उमटवणारे, रिपब्लिकन पक्षाचे आयटि सेल अध्यक्ष व युवक आघाडी उपाध्यक्ष दिवा विभाग सौरव आढांगळे यांना आज मुंबई विद्यापीठ शाहु शिक्षण संस्थेमधून पॉलिटिकल सायन्स या विषयाची पदवी बहाल करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात बरोबर शैक्षणिक क्षेत्रात ही आपले नावलौकिक करणारे सौरव आढांगळे यांनी तरूणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
क्षेत्र कोणतेही असो तरूणांनी त्या कडे दुर्लक्ष करता कामा नये, या देशाचे भवितव्य हे तरूणांच्या हाती आहे व तरूणांने आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्याईने आज शैक्षणिक,राजकीय, सामाजिक क्षेत्रात आज आपण नाव कमवत आहोत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत असे मत सौरव आढांगळे यांनी व्यक्त केले.



