आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान चां हळदी कुंकू समारंभ मोठया उत्साहात संपन्न..
अमित जाधव - संपादक
ठाणे,दिवा आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान तर्फे सोमवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.
मकरसंक्रांतीनिमित्त सोमवारी दिवा आगासंन फाटक येथे आगरी समाजातील महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलाना हळद कुंकू लावत भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले.तसेच ऑटो रिक्षा चालक महिलांचा देखील यावेळी सत्कार केला स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संगीत खुर्ची आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह अनेकांचा सन्मानित करण्यात आले अधिक महिलांची उपस्थिती राहिली.
करा.देवयानी मुंडे यांची प्रमूख उपस्थित आध्यक्ष उषा मुंडे, उपाध्यक्ष रंजना तांडेल,पूनम मुंडे,योगिता मुंडे,दीपिका मुंडे. सोनम मुंडे,प्रीती पाटील,भारती म्हात्रे,ज्योती म्हात्रे,सविता वायले,भारती पाटील,आदी पदाधिकारी महिलांनी अथक परिश्रम घेऊन उपक्रम यशस्वी केला.



