Breaking
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव समारंभ…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

 

दि. ३० ( ठाणे) – जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, ठाणे अशोक शिनगारे यांच्या सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे जिल्हा परिषद कार्यालय ठाणे येथे गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपल्या स्नेहपूर्ण भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक शिनगारे व त्यांच्या पत्नी स्मिता शिनगारे यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत जिल्हाधिकारी यांच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यकाळातील नेतृत्व, प्रभावी धोरण राबविणे व सर्वांगीण प्रशासनिक कार्यक्षमता याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.

या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यांचा मागोवा घेणारी एक विशेष चित्रफीत व छायाचित्र सादरीकरण करण्यात आले, ज्यात जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वपूर्ण योजना, उपक्रम व क्रियाशील सहभाग यांचे दर्शन घडवले.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे मनोगतातुन अत्यंत भावूकपुर्ण रितीने प्रशासनात काम करताना जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी वर्गासोबत जिव्हाळ्याने तसेच आपुलकीने कामकाज करून सर्व अधिकारी-कर्मचारी यांना मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

यानंतर जिल्हा परिषदेतील विविध अधिकारी वर्गाच्या वतीने मनोगत सत्रात प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, तसेच विविध विभागप्रमुख यांनी मनोगत व्यक्त केले, जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यपूर्ण, मार्गदर्शक व प्रेरणादायी नेतृत्वाचे कौतुक केले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना अशोक शिनगारे यांनी आपल्या सेवाविषयक अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांनी ठाणे जिल्ह्याशी निर्माण झालेल्या आत्मीयतेच्या नात्याचा भावनिक उल्लेख करत जिल्हा परिषदेच्या सर्व सहकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच शासकीय कामकाज प्रभावीपणे राबवता आल्या, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या समारंभाने एक कर्तव्यनिष्ठ, दूरदृष्टीसंपन्न व लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी यांच्या सेवेला सन्मानपूर्वक निरोप देण्याची संधी जिल्हा परिषदेला मिळाली. जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे