वसई रोड – दिवा मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कामासाठी दोन दिवशीय ब्लॉक … अनेक मेमू गाड्याच्या फेऱ्या रद्द…
अमित जाधव - संपादक

ठाणे-दिवा वसई विरारमधील बहुतांश नागरिक हे मध्यरेल्वेवर धावणाऱ्या वसई- दिवा-पनवेल या मार्गावरून प्रवास करतात. तर दुसरीकडे जूचंद्र, कामण, खारबाव, भिवंडी या स्थानकातून अनेक ग्रामीण भागातील नागरिक या गाडीने आपला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागाकडे येत असतात. पण, वसई रोड – दिवा मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी दोन दिवसीय विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा ब्लॉक घेतला जाणार असून या कामामुळे मुंबई सेंट्रल विभागांतर्गत धावणाऱ्या अनेक मेमू गाड्यांच्या फेऱ्या या रद्द केल्या जाणार आहेत.
या ब्लॉकमुळे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळ सत्रातील मेमू गाडीच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणारे तसेच सुट्टीनिमित्त खास बेत असणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच या कामामुळे लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत अॅपवर किंवा चौकशी खिडकीवर खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
‘या’ गाड्या होणार रद्द
शनिवार – ६१००७ (वसई रोड – दिवा मेमू): दुपारी ३:२३ वाजता
शनिवार – ६९१६६ (वसई रोड – पनवेल मेमू): दुपारी ४:४० वाजता रविवार – ६१००१ (बोईसर – वसई रोड मेमू): सकाळी ८:३५ वाजता
रविवार – ६१००३ (वसई रोड – दिवा मेमू): सकाळी ९:५० वाजता



