Breaking
ब्रेकिंग

मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त तीसाई नगर शाखा ,निलेश म्हात्रे आयोजित भव्य दिव्यांग सहायता शिबिर संपन्न….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता 9 मे : दिवा शहरातील दात्तिवली रोडवरील शिवसेनाच्या तिसाई नगर शाखेत माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांनी दिव्यांग सहाय्य शिबीर आयोजित केले होते.

प्रसंगी दिवा शहर व आजूबाजूच्या भागातील अनेक दिव्यांगांनी सदर शिबिराचा फायदा घेतला. सदर शिबिरात दिव्यांग्ना मोफत साहित्य वाटप, जयपूर फूट, व्हील चेअर, विविध प्रकारच्या स्टिक तसेच मोफत कृत्रिम अवयव शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण 72 दिव्यांग महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला असून सदर शिबिराचा फायदा घेतला.

दिव्यांग सहाय्य शिबिराचे आयोजक तिसाई नगर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निलेश म्हात्रे यांच्या आयोजनखाली सदर शिबिरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत असंख्य महिला व पुरुष व लहान मूल दिव्यांगाणी सहभाग घेतला होता. प्रसंगी सदर शिबिरास मा. नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे