
मोठी बातमी ! MBBS चा पेपर फुटला
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात MBBSया वैद्यकीय परीक्षेचा द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. परिक्षा सुरू होण्यासाठी एक तास बाकी होता. मात्र त्याच वेळी ‘फार्माकोलॉजी -1’ या विषयाचा पेपर सोशल मीडियावर लीक झाला. या परिक्षेसाठी राज्यभरातील 50 केंद्रांवर जवळपास 7,900 विद्यार्थी परिक्षा देणार होते मात्र त्यांना आता 19 डिसेंबरला फेरपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.