Breaking
ब्रेकिंग

दिवेकरान साठी लवकरच नवीन स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
दिवा -दिवावासीयांना लवकरच स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळणार असल्याने येथील नागरिकांची सोय होणार आहे.  या संदर्भात ठाणे टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक समीर महाजन यांनीही दिवा पोस्ट ऑफिसला भेट दिली.  यासोबतच त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि दिव्यातील रहिवाशांना लवकरच स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे भाजप ठाणे शहर (जिल्हा) विजय भोईर हे गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील होते. या वेळी शाखा पोस्ट मास्तर कांदबरी कोळी, दिवा भाजपचे  सरचिटणीस अवधराज राजभर आदी उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून होती मागणी..
 दिवा शहरातील नागरिकांची सोय लक्षात घेऊन येथील पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र पिन कोड असलेले सोयीचे टपाल कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.
त्याचबरोबर दिवा पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येणारी पत्रे, महत्त्वाची कागदपत्रे व वस्तू आदी वेळेवर मिळत नाहीत सर्वात महत्वाचे म्हणजे दिवा शहराचा स्वतंत्र पिन कोड नंबर  नाही शहराची लोकसंख्या ६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.  मात्र येथील लोकांना मुंब्रा शहराचा पिन कोड क्रमांक ४००६१२ वापरावा लागतो.  सदर पिन कोड क्रमांकामुळे दिवा येथील नागरिकांना ऑनलाईन खरेदी सेवा व कर्ज यांसारख्या सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आता दिव्यातील रहिवाशांना स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळणार आहे त्यामुळे दिव्यातील नागरिक आनंदी आहेत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे