Breaking
ब्रेकिंग

दिव्यात ठाकरेंच्या पक्षातील युवा सेनेचे नवनियुक्त पदाधिकारी जाहीर…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
♦कल्याण ग्रामिण विधानसभा क्षेत्रामधील दिवा शहरातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कल्याण ग्रामिण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरातील युवासेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पात्र वाटपाचा कार्यक्रम माजी आमदार सुभाष गणू भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख सदानंद थरावळ कल्याण लोकसभा युवा अधिकारी कल्याण जिल्हा प्रतिक पाटील, उप युवा जिल्हाधिकारी स्वप्निल पावशे व कल्याण ग्रामिण विधानसभा अधिकारी सुरज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवा शहरातून युवानेते श्री. सुमित सुभाष भोईर व दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५३ युवासैनिकांची पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.
यावेळी कल्याण तालुका अधिकारी जयेश म्हात्रे, अंबरनाथ तालुका अधिकारी प्रदीप मढवी, डोंबिवली (पूर्व) शहर अधिकारी प्रसाद टुकरल, उप तालुका अधिकारी आवेश गायकर, दिवा शहर सचिव उमेश राठोड, उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे