
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना उद्या (5 डिसेंबरला) आनंदाची बातमी मिळू शकते. अखेर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार, हे निश्चित झाल्यानंतर उद्या शपथविधी आहे. या सोहळ्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे. महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. यासंदर्भातील निर्णय उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.