Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जनजागृती सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत —

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

जनजागृती सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत ————————————————————बदलापूर-दर्पणकार आचार्य बाळशास्स्री जांभेकर यांचा जन्म दीवस मराठी पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ.काही नावाजलेली वर्तमानपत्र धन दांडग्या भांडवलदारांची आहेत.पण या डीजिटल युगातही इलेक्ट्रॉनिक मिडीयालाही टक्कर देत काही दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक आपल अस्तित्व टिकवून आहेत.अशा या वर्तमानपत्रांचे संपादक आर्थिक तोटा सहन करुनही आपले वर्तमानपत्र काढत आहेत.सहसा अशा संपादक, पत्रकारांचा शासन दरबारी कींवा नावाजलेल्या पत्रकार संघटना पुरस्कार,सन्मान करत नाही,पण महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान व्हावा हा जनजागृती सेवा समितीचा उद्देश.त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी पत्रकार दिनी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार यांचा सन्मान व्हावा म्हणुन जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने या पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”पाठवुन सन्मानित केलेले आहे.वर्तमानपत्रांचे संपादक,पत्रकार यांना त्यांच्या व्हाटसपनंबरव’सन्मानपत्र’पाठवुन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दील्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे