Breaking
ब्रेकिंग

हात भाजलेल्या लहानग्या रुद्रांशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून* शिवसेना उमेदवाराची प्रचार रॅली बाजूला ठेवत लहानग्यावर केले उपचार..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

हात भाजलेल्या लहानग्या रुद्रांशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

शिवसेना उमेदवाराची प्रचार रॅली बाजूला ठेवत लहानग्यावर केले उपचार..

ठाणे :- शहरातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली आज किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या रॅलीला सुरुवात झाली असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा एक आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पहायला मिळाला.

शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली,मात्र रॅली सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी एक आई आपल्या जखमी मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने चाललेली दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल तर हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला असल्याने ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. अशात मुख्यमंत्र्यांनी तिला पाहिले आणि त्या माऊलीची अडचण जाणून घेत ते रॅली सोडून तिच्या मदतीला धावून गेले.

त्यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतले आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्यांच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले.

रुद्रांश रोनीत चौधरी असे या नऊ वर्षाच्या मुलाचे नाव होते. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही ओळख ठाणेकर नागरिकांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे