
आज दिनांक १४/०४/२०२५ रोजी ११:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार इको स्टेट टॉवर, फडके पाडा तलावाजवळ, चौधरी कंपाऊंड, दिवा. ठाणे या ठिकाणी इको स्टेट टॉवर (तळ + ०७ मजली इमारत)या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१-फायर वाहनासह व टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर इमारतीचा विद्युत पुरवठा टोरंट पॉवर कर्मचारी यांच्याकडून सुरक्षतेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ११:४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे.*
परिस्थिती नियंत्रणात आहे.