Breaking
ब्रेकिंग

मनसे च्या विभाग अध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मनसेची मागणी; ठाणे पोलीस आयुक्तांची घेतली भेट…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा मनसेचे शीळ – देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील हे शीळ विभागात आरक्षित भूखंडांवर आणि वनविभागाच्या जमिनींवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईसाठी सातत्याने महापालिका आणि वन विभागाकडे पाठपुरावा करत असतात. याच रागातून त्यांना काही दिवसांपूर्वी फोन वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याबाबतची तक्रार शरद पाटील यांनी डायघर पोलीस स्टेशन येथे केली होती. पण त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने पाटील कुटुंबीय चिंतेत होते. त्याच संदर्भात मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोइर यांच्या सोबत काल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. यावेळी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली. मनसे नेते आणि माझी आमदार श्री. राजू पाटील यांनीही या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कडक कारवाईची मागणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे