ठाणे–दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण…..
अमित जाधव-संपादक
*ठाणे–दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.
*जेव्हा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम चालू असताना मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी लक्ष देऊन प्रत्येक मेगाब्लॉक वेळी सर्व सामान्य प्रवासीयांना होणारा त्रास लक्षात घेऊन जादा बसेस ची सोय केली व प्रत्येक वेळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली तेव्हा बाहेरून आलेले एकही खासदार आमदार उपस्थित नव्हते आज उदघाटनाच्या दिवशी मात्र अनेक खासदार आमदार उपस्थित होते -मा.उप महापौर रमाकांत मढवी*
*”बेगाना शादी मे अब्दुला दिवाना”केन्द्रातून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी नि वेळो वेळी लागणारा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज ठाणे दिवा दरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्गाचा प्रकल्प मार्गी लागला आणि याचे श्रेय इतर पक्ष घेत आहेत-रोहिदास मुंडे(भा ज प)
ठाणे, ता 18 फेब्रु : ठाणे–दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्या उपस्थितीत होते आहे. या दोन मार्गिकांचा तात्काळ आणि दूरगामी असे सकारात्मक परिणाम रेल्वे सेवेवर होणार आहेत. एकमेकांच्या वेळात अडचण निर्माण करणाऱ्या लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्यांचे मार्ग या मार्गिकांमुळे मोकळे होणार आहेत. नव्या लोकल सुरू होण्यास यामुळे मदत होणार असून एकंदरीत रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
या मार्गिकेला २००८ साली मंजुरी मिळाली. पुढे याचे काम विविध कारणांनी रखडले. भुसंपादन, आराखड्यातील बदल, पुनर्वसन, विविध शासकीय परवानग्या अशा अनेक समस्या या कामात होत्या. रेल्वे प्रशासनासमोर या मार्गाचे काम एक दिव्य होते. २०१५ नंतर खऱ्या अर्थाने या मार्गिकेच्या कामास सुरवात झाली. या कामात सहभागी होत खारीचा वाटा उचलता आला याबाबत आज समाधान वाटते. एकूण ९.४४ किलेमीटर लांबीच्या या कामात दोन रेल्वे मार्गिका, ८ नवे फलाट, ८ नवे पादचारी पूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल, १ भुयारी मार्ग, १.४ किलोमीटरचा एक उड्डाणपूल, १७० मीटरचा एक बोगदा आणि सेवा इमारतींच्या कामाचा समावेश आहे. गेल्या १४ वर्षांनंतर अखेर हे मार्ग आज सेवेत दाखल झाला आहे.


