मुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,पाच आरोपीसह चोरीचे शेकडो महागडे मोबाईल व ५०२ कोरेक्स बॉटल एकूण नऊ लखापेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत….
अमित जाधव - संपादक
मुब्रा पोलिस स्टेशन च्या हद्दीत दिनांक ११/०५/२०२३ रोजी सहायक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे यांना त्यांचे बातमीदाराकडुन रशीद कंम्पाउन्ड, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे या ठिकाणी एका इसमाचे घरात चोरीचे मोबाईल व मॅक्सकॉफ कंपनीच्या कफ सिरफ बॉटल्स साठवणुक करून ठेवली असल्याबाबत माहिती मिळालेवरून रिजवान चाळ, रुम नंबर ०२ चे बेडरुममध्ये, सी.विंग, चरणीपाडा, मुक्ता घरांदा कॉम्प्लेक्सचे बाजूला, रशीद कंम्पाउंन्ड, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी / अंमलदार यांचेसह छापा मारला. सदर ठिकाणी १) फैयाज फरीद शेख, वय २४ वर्षे, रा. रिजवान चाळ, रुम नंबर ०२, सी. विंग, चरणीपाडा, मुक्ता घरांदा कॉम्प्लेक्सचे बाजूला, रशीद कंम्पाउन्ड, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे या इसमाचे ताब्यात सदर ठिकाणी वेगवेगळया कंपनीचे ६२ मोबाईल फोन मिळून आले तसेच नशेसाठी वापरल्या जाणा-या मॅक्सकॉप कफसिरफच्या ५०२ बॉटल्स मिळुन आल्या. सदरचे मोबाईल हे चोरीचे असुन त्याची विक्री करण्यासाठी घेतल्याचे तसेच कोरॅक्स बॉटल या विक्री करण्याकरीता साठा केल्याचे आढळुन आल्याने नमुद इसमाविरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात ५१९/२०२३, भादवि कलम ३७९, ३२८,२७६, ३४ सह औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा कलम १९४० व त्या अंतर्गत नियम १९४५ चे कलम १८ अ, २८.१८ (क), २७ (ब) (२) प्रमाणे दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे.
तसेच नमुद आरोपीत याचे घरझडती मध्ये मिळून आलेले वेगवेगळ्या कंपनीचे ६२ मोबाईल बाबत पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता. त्याने
इसम नामे २) मोहम्मद शोएब सलीम शेख उर्फ राज, वय २१ वर्षे, रा. रुम नंबर ०१, सुदाम चाळ, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे याचेसह चोरी करून आणल्याचे माहिती दिली. तसेच सदरचे मोबाईल हे चोरी केलेनंतर ते गुन्हयातील आरोपी
मोहम्मद हन्जला सलीम अन्सारी उर्फ केफ, वय २० वर्षे, व्यवसाय मोबाईल दुरुस्ती, रा. गुलशन ए. फिरदोस कॉलनी, ए.चाळ, रुम नंबर ०३, रशिद कंम्पाउन्ड, मुंब्रा, ता. जि. ठाणे यास विक्री करीत होते अशी माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याचेकडील मोबाईलचे आय.एम.ई.आय नंबर ब्रेक करण्याकामी त्यांचे ओळखीचे इसम नामे ४) फैसल सलाउद्दीन शेख, वय २० वर्षे, व्यवसाय मोबाईल रिपेरिंग, रा. मुक्ताबाई अपार्टमेंन्ट, रुम नंबर ४०३ चरणीपाडा, कौसा, मुंबा, ता. जि. ठाणे.
५) मोहम्मद अझहर जुबेर शेख, वय ३२ वर्षे, व्यवसाय मोबाईल रिपेरिंग, रा. जी चाळ, रुम नंबर ०५, पापा का नाका चरणीपाडा, कौसा, मुंबा, ता. जि.ठाणे यांना देत असले बाबत त्यांने सांगितल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
वर नमुद आरोपी क. २ ते ५ कडील आरोपीतांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दि.१४/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली असुन गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी क.१ याचेकडे छापा टाकला त्यावेळी त्याचेकडे ६२ मोबाईल, आरोपी क.२ याचेकडे १३ मोबाईल तसेच आरोपी क्र.५ याचेकडे १६ मोबाईल असे एकुण ९१ मोबाईल फोन व आयएमईआय नंबर ब्रेक करण्यासाठी वापरण्यात आलेला १ लॅपटॉप व सॉफ्टवेअर हस्तगत करण्यात आले आहे.
नमुद आरोपीत यांना मा. न्यायालयाने दिनांक १९/०५/२०२३ पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन सदर आरोपींकडुन मिळुन आलेल्या मॅक्सकॉप कफसिरफच्या ५०२ बॉटल्स आरोपीने कोठुन व कोणाकडुन विकत घेतल्या याबाबत तपास चालू आहे.आरोपींवर अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत
सदरची उल्लेखनीय कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ श्री गणेश गावडे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग श्री. विलास शिंदे सो यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, सहा. पोलीस निरीक्षक / कृपाली बोरसे, पोउपनिरी/मकानदार, व पथकातील पोलीस स्टाफ पोहवा / १२५५ पवार, पोना / ६९३३ गायकवाड, पोना/ ७११७ सपकाळे, पोना / १२०२ लोंढे, पोना/७२६१ माळी, पोना/७३२५ जुवाटकर, पोशि/ २६३४ चव्हाण, पोशि/ २११६ जमदाडे, पोशि/ ७७४४ खैरणार, पोशि/ ७७४० काकड, पोशि/ ७६४१ एडके या पथकाने केली आहे. पुढील तपास सहा.पो.निरी/कृपाली बोरसे व पथक करीत आहेत.



