दिवा प्रभाग समिती हद्दीत बस थांबे उभे करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक,
दिवा प्रभाग समिती हद्दीत बस थांबे उभे करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक
ठाणे: दिवा प्रभाग समिती हद्दीत बस थांबे उभे करण्याबाबत ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडील परिवहन विभागाकडे श्री आनंदा मारुती पाटील, उपाध्यक्ष, मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांनी मागणी केली.
परिवहन उपव्यवस्थापक, ठाणे महानगरपालिका, श्री सुनिल जाधव यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक तक्रार निवारण पत्र पाठवले, ज्यामध्ये नमूद केले आहे की, दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत पूर्वी 22 बस थांबे (स्टॉप पोल) उभारले गेले होते. तथापि, सध्याच्या पहाणीमध्ये केवळ 7 बस थांबे अस्तित्वात आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी सांगितले की, दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, ज्यामुळे उर्वरित बस थांबे काढण्यात आले आहेत. त्यामुळे, तात्काळ बस प्रवासी निवारे उभारणे शक्य नाही.परंतु, रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.संबंधित विभागाने श्री पाटील यांच्या सुचनेबद्दल आभार मानले असून, स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीसाठी याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



