शिवसेना दिवा शहराच्या वतीने दिवा शहरात भव्य वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.. जवळ जवळ ८००० पेक्षा जास्त विद्यार्थी होणार सहभागी..
अमित जाधव - संपादक
शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या 31 ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आलेले आहे. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे हे ५ वे वर्ष असून यावर्षी तब्बल 8000 पेक्षा जास्त स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे आयोजक शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. सदर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत एक किलोमीटर, दीड किलोमीटर, दोन किलोमीटर तर खुल्या गटासाठी पाच किलोमीटरचे अंतर असणार असून सदर स्पर्धा दिवा चौक ते दिवा आगासन रोड येथे पार पडणार आहे. दिवा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमधील सहभागी चारी गटातील विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात येणार येणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सेवेसाठी स्थानिक डॉक्टरांचे पथक हे मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय दोन रुग्णवाहिका देखील तैनात करून ठेवण्यात येणार असल्याचे आयोजक रमाकांत मढवी यांनी सांगितले आहे. या स्पर्धेसाठी सकाळी ७ ते १० या वेळेतील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून सदर स्पर्धेच्या वेळी वाहतूक पोलीस व महानगरपालिका अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. शिवसेना दिवा शहराच्या वतीने दिवा शहरातील विद्यार्थ्यांसाठी व होतकरू खेळाडूंसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रम ठेवले जातात, यावर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत ही दिव्यातील सर्व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश भगत, स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, स्थानिक नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली भगत, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवती सेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असल्याचे रमाकांत मढवी यांनी सांगितले.