*⭕️भारतीय मराठा संघ दिवा शहर यांच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात.*
ठाणे, दिवा. ता 12 जाने ( संतोष पडवळ) : भारतीय मराठा संघ दिवा शहर यांच्या वतीने 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आर्किटेक्ट श्री एस डी पाटील (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ड्यू ड्रॉप स्कूल च्या मैदानात शालेय विद्यार्थीनिना सेल्फ डिफेन्स चे श्रीराम सोतोकॉन कराटे डू अँड कोबोडो असोसिएशन यांच्या वतीने श्री ऋषिकेश भगत यांच्या टीमने मुलीना बेसिक ट्रेनिंग दिले मान्यवर म्हणून संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष दीपक पालांडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश पाटील सर, ठाणे शहर अध्यक्ष श्री उमेश गोगावले, ठाणे संपर्क प्रमूख अरुण फणसे, मुंबई संपर्क प्रमूख श्री प्रकाश पाटील, राज्य कोर कमिटी सदस्य सुनीता ताई गव्हाणे, प्रमूखमार्गदर्शिका सौ शिल्पा सावंत , सौ दीपिका पालांडे, यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रसंगी श्री उत्तम सावंत सर व यस हॉस्पिटलचे डॉ महाजन सर , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर, उपाध्यक्ष नामदेव पाटील, सुधीर घाणेकर, उपसचिव गणेश जाधव, दिलीप कदम, गजेंद्र सावंत, शैलेंद्र कदम, विशाल सावरतकर, बबन गवसेकर, अशोक दोडेकर, अनिकेत शिंदे, यश पालांडे, सामाजिक संघटनेच्या वतीने श्री बालाजी कदम, धनाजी पोवार, तसेच निकिता सालप, गौरी बेर्डे, भावना गुरव,नम्रता पाटील ,नम्रता खराडे, या महिला पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शिवली कोरोणाचे नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .