भाजपचे रोहिदास मुंडे यांची ठाणे पोलिसांना निवेदनाद्वारे शिवसेनेच्या उपशहर प्रमुखा विरोधात तक्रार…
अमित जाधव - संपादक
दिवा:-दिवा भाजपने 10 एप्रिलला दिव्यात हॉस्पिटल व्हावे यासाठी ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या पुढाकाराने केलेल्या आंदोलनाची व मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांची शिवसेनेचे दिवा पछिमेतील उपशहर प्रमुख यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवत बदनामी केल्याचे सांगत दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
दिवा न्यूज या व्हाट्सअप ग्रुप वर दिवा भाजपने दिव्यात पालिकेचे हॉस्पिटल व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख यांनी बंटी आणि बबलीच्या आंदोलनाकडे दिवावासियांसोबत स्थानिक पदाधिकारी आणि ठाण्यातील नेत्यांनी फिरवली पाठ, कालच्या आंदोलनाकडे पाठ अशा आशयाचे मेसेज स्वतःच्या व्हाट्सअप नंबर वरून पोस्ट केले.या मेसेजमध्ये यांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिव्यातील महिलांचा अपमान केला असा आरोप भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यात हॉस्पिटल व्हावे ही महिलांची मागणी आहे आणि त्या मागणीची खिल्ली शिवसेना उपशहर प्रमुख उडवत आहेत. यांनी या मेसेजमध्ये मंडळ अध्यक्ष हे स्वतःला शहर अध्यक्ष समजतात म्हणून ठाण्यातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगत महिला मंडळ अध्यक्ष या शहर अध्यक्षा म्हणून स्वतःला मिरवतात असा उल्लेख केल्याने भाजपच्या पक्ष संघटनेची खिल्ली उडवत असून पक्षाची, दिव्यातील महिलांच्या आंदोलनाची व रोहिदास मुंडे यांची वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना उपशहर प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं रोहिदास मुंडे यांनी पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.



