दिवा शहरातील बेतवडे गावात असलेल्या खदानी मद्ये शुक्रवारी काही मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्यमुळे १६ वर्षाच्या रोहित राऊत या मुलाचा बुडून मृत्यू झाला. तो त्याच्या १० वर्षाच्या लहान भावासह पोहण्यासाठी गेला होता.बुडत असताना त्याने लहान भावाला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हात झटकून खदानीच्या वरती आल्याने सुदैवाने बचावला. नंतर त्यानेच रोहित बुडाला असल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली.मृत रोहित दिवा शहरातील दादुस नगर मधील शिवगण चाळीत रहात होता.या घटनेची माहिती मिळताच शिळ अग्निशमन दलाचे जवान तसेच ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचा-यांनी मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो या दिवां पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांनी कायदेशीर बाबीची पूर्तता करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला व पुढील तपास दिवा पोलिस करत आहेत
Related Articles

ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…
4 hours ago