बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग, मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळली……

अमित जाधव-संपादक

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक

यवतमाळ, 28 सप्टेंबर : मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याल्याची घटना नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या एसटी बसमध्ये 20 ते 22 कर्मचारी होते. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे