Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची हकालपट्टी करा,भाजपा सरचिटणीस दत्ता घाडगे

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

*ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची हकालपट्टी करा*
ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका कडे पैसे नाहीत अशी बोंब करत सफाई कर्मचार्‍यांचे पगार गेल्या तीन महिन्यापासून दिले नाही, शिवाय घाणीमध्ये काम करत असताना कोणतीही सुरक्षा साधने त्यांना दिली जात नाहीत. मात्र आयपीएल चे बॅनर संपूर्ण ठाणे शहरात महानगरपालिकेने लावले आहेत त्याबद्दल आम्ही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो. ठाणे हे सुसंस्कृत लोकांचे शहर आहे आणि या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कोणती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे हे समजण्याची कुवत जर नसेल तर अशा बेअक्कल अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या विषयात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी व लोकांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या ठाणे महानगर आयुक्तांना जाब विचारावा व योग्य ती कारवाई करावी. अगोदरच कोरोनामुळे ठाणे महानगरपालिका दिवाळखोरीत निघाली आहे आणि अशावेळी अशी उधळपट्टी किती योग्य आहे? याअगोदर सुद्धा कोरोना काळात जे ट्रॅफिक वॉर्डन रस्त्यावर उभे राहून जीवाची पर्वा न करता काम केले होते अशांचा पगार सुद्धा ठाणे महानगरपालिकेने एक वर्षानंतर दिला. त्यामुळे गरीब गरजू गरजेपोटी साफसफाई सारखे काम करणाऱ्या लोकांना पगार न देणे ही अतिशय खेदाची बाब आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. याबाबत लवकरच कायदेशीर गोष्टींचाही विचार करून , योग्य ती कायदेशीर कारवाई बाबतीतही आम्ही विचार करत आहोत अशी माहिती भाजपा चिटणीस ठाणे शहर श्री दत्ता घाडगे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे