बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

विक्रोळी टागोर नगर येथे मनसेच्या वतीने covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न —–नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..

अमित जाधव-संपादक

विक्रोळी टागोर नगर येथे मनसेच्या वतीने covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न —–नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई (प्रतिनिधी ) विक्रोळी विधानसभा प्रभाग क्र.११९ मनसे शाखाअध्यक्ष श्री.संतोष देसाई, उपशाखाअध्यक्ष श्री.सचिन शिवलकर आणि मनपा एस वॉर्ड यांच्या वतीने आयोजित *मोफत covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे* उद्घाटन विक्रोळी विधानसभा विभागअध्यक्ष श्री. विश्वजीत ढोलम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले त्याप्रसंगी मनसे जनहित विधी कक्षाच्या उपाध्यक्षा सौ.प्रांजल जाधव, उपविभागअध्यक्ष किसन गावकर, महिला सचिव निशाताई शेट्टी, विद्यार्थी सेना विभागअध्यक्ष प्रशांत परुळेकर,महिला उपविभागअध्यक्ष संगीता पैगणकर, सहकार सेना विभागसंघटक ज्योती वरक, शाखाअध्यक्ष जयंत दांडेकर, दिनेश धर्णे, अरुण बालन, वाहतूक सेना चिटणीस साजीद अन्सारी,विद्यार्थी सेना शाखाअध्यक्ष प्रतिश बोराडे, महिला शाखाअध्यक्षा आदिती नाईक, नीलम पाटील, उज्वला केनी, माजी महिला विभागअध्यक्षा सुचिता माने,माजी शाखाअध्यक्षा कुंदाताई वारोसे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंडपणे सेवा दिल्याबद्दल मनपा मेडिकल स्टाफ व डॉक्टर यांचा कोवीड योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करून गौरव करण्यात आला
तरी विभागात 100% लसीकरण व्हावे आणि प्रत्येक नागरीकांचे कुटुंब सुरक्षित निरोगी रहावे या हेतुने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आनंद सेवा संघ जेतवन बुद्धविहार हॉल टागोर नगर येथे मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले .सदर शिबिर महिला पुरुष उपशाखा अध्यक्ष गटअध्यक्ष महाराष्ट्र सैनिक यांच्या सहकार्याने तसेच विभागातील नागरिकांच्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाले असून या शिबिराला आनंद सेवा संघाचे सहदेव कांबळे केटी सावंत व वनिता फाऊंडेशनचे संस्थापक प्रभाकर कांबळे यांनी भेट दिली असून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मनसेच्या वतीने गौरव करण्यात आला. शेवटी मनसे शाखा क्रमांक 119 चे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई यांनी सर्वांचे आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे