बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

येत्या 16 ऑगस्ट ला दिवा ते सी एस टी एम लोकल साठी सर्वांनी यावे एकाच छताखाली, अमोल केंद्रे उपोषण करण्यावर ठाम…

अमित जाधव - संपादक

दिवा तो दिवा आहे.ज्योत पेटली असेल तरच प्रकाश पडनार आहे. अंधारमय दिवा शहरात विकासमय प्रकाशाची ज्योत पेटवण्यासाठी 2019 मध्ये 16 दिवस आमरण उपोषण करणारा प्रत्त्येक समस्या साठी अनेक आंदोलने मोर्चे,उपोषण करणारा आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती तो आजही लढतो आहे.कोना साठी तुमच्या आमच्या सर्वांच्या साठी.रोजच्या जीव घेण्या प्रवासातून मुक्तता मिळण्यासाठी.2014 पासून राजकीय लोकांच्या कडून फक्त आश्वासने मिळतात.2024 आला तरीही काही नाही.गेल्या 10 वर्षात अंदाजे 1 हजार पेक्षाही जास्त दिवा शहरातील होय आपल्या दिवा शहरातील अपघाती मृत्य झाले आहेत.याचे जिम्मेदार कोण?आणखी किती जीव जाण्याची आपण वाट पाहणार आहोत आपण.माता,भगिनी, विद्यार्थी,वयोवृद्ध जीव मुठीत घेवून लटकत लोकलने प्रवास करतात.यावर कोणी बोलत नाही. कोणीतरी आपल्यासाठी आपल्यातील एक सामान्य व्यक्ती पुढे आली. त्याने स्वाक्षरी मोहीम घेवून हजारो प्रवाशांच्या व्यथा शासन,प्रशासन दरबारी मांडल्या.खासदार साहेब,मुख्यमंत्री साहेब,राज्यपाल साहेब ,रेल्वे प्रशासन सर्वांच्या कडे पाठपुरावा केला.त्याही नंतर मौर्चा काढला तरीही प्रशासन लक्ष देत नसेल तर काय करायचे.रोजचे अपघात थांबवण्यासाठी आपल्या माता भगिनींचे जीव,प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी तो आमरण उपोषण करणार आहे.आपलेही कर्तव्य आहे.आपणही साथ द्यायला हवी का?होय फक्त साथ नाही सोबत जावून लढूया.हा संघर्ष आपल्या साठी आहे.याची जाण ठेवून झोपलेल्या रेल्वे प्रशासनास,शासनास जागे करण्यासाठी एक तरी पोस्ट फेसबुक वर करूया.आणि 16 ऑगस्ट रोजी सुट्टी घेवून हजारोंच्या संख्येने आमरण उपोषण ठिकाणी जावूया अमोल धनराज केंद्रे यांच्या आपल्या लढ्यात सहभागी होवून साथ देवूया.तरच आपल्या सर्वांची दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू होईल.हा संघर्ष जुना आहे.आपल्यातील अनेकांचे जीव वाचवण्यासाठी आहे.पक्ष,राजकारण,जात,धर्म थोडे बाजूला ठेवूया आपण सर्वजण एकत्र येवून संघटित होवून संघर्ष करूया लढुया. आपल्या हक्कासाठी मी तयार आहे.माझ्या नाही तुमच्या,आमच्या आपल्या सर्वांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अमोल धनराज केंद्रे यांना साथ द्यायला.तुम्ही तैय्यार आहात का?विचार नाही निर्धार करूया हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया असा एल्गार प्रवाशांचा वज्र मूठ दिवा वासियांची घोषणा देत समाजसेवक अमोल केंद्रे यांनी स्पष्ट केलं.

https://chat.whatsapp.com/BJvcOGnXAIr0N1zUQbJxjx

लिंक ला जॉईन होऊन पहा दिव्यातील लाईव्ह घडामोडी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे