Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालयात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालयात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती

ठाणे -: ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालयात अॅड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी फेरीवाल्याकडून चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी जलदगती न्यायालय स्थापन करणे व विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करणे याबाबत ठाणे महापालिकेच्यावतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास शासन पत्रान्वये पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणी शासनाच्या अधिसूचनेनुसार अॅड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे