दिव्यात शिवशक्ती रिक्षा चालक-मालक संघटनेची प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण महापूजा संपन्न…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २६ जानेवारी : दिव्यात शिवशक्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भगत यांनी सर्व रिक्षा चालक मालक आणि दिवेकराना निमंत्रित करून कार्यक्रमात सहभागी होण्यास उपकृत केले.
शिवशक्ती रिक्षा चालक मालक संघटना दिव्यातील एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम राबविले जात आहेत. कोरोना काळात देखील संघटनेने दिव्यातील शेकडो रिक्षा चालकांना एक हात मदतीचा देत सहकार्य केले असे संघटनेचे खजिनदार प्रवीण बार्शीकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
शिवशक्ती संघटनेच्या रिक्षा चालक मालक यांनी अथक परिश्रम घेत संघटनेत सक्रिय असे योगदान दिले आहे असे ही त्यांनी सागितले. प्रसंगी अनेक वर्षापासून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सत्यनारायणाची महापूजा होत असून अनेक मान्यवर उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घेतात तर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. विविध योगदान असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



