आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
एकविरा देवी मंदिर कार्ला येथे मोठी दुर्घटना,झाड कोसळून 3 वाहनाचा चुराडा….
अमित जाधव-संपादक
वेहेरगाव-कार्ला येथील एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. या परिसरातील वाहन तळात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या भाविकांच्या तीन वाहनांवर निलगिरीचे मोठे झाड पडल्याने तिन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.
एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी वेहेरगाव-कार्ला येथे भाविक मोठी गर्दी करत असतात. आजदेखील या परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही भाविकांनी आपल्या गाड्या वाहन तळात पार्क केल्या होत्या. यावेळी अचानक एक मोठे झाड थेट चारचाकी वाहनांवर कोसळले. यात तीन गाड्यांचा चुराडा झाला आहे. सुदैवाने या तिन्ही वाहनांमध्ये तसेच जवळ कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, या घटनेनंतर मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण झाल्याचंही पाहायला मिळालं.