Breaking
ब्रेकिंग

दिवा शहर भाजप ने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नागरिकांना बसण्यासाठी बेंच (बाक)वाटप….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कोकण पदवीधर मतदार संघ आमदार तथा भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री निरंजन डावखरे साहेब यांच्या निधीतून दिवा शहरासाठी उपलब्ध झालेल्या नागरिकांना बसण्यासाठी चे बेंच ( बाक ) यांचं आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सृष्टी गार्डन सोसायटी A / B विंग , तसेच साई प्रसाद अपार्टमेंट , मधील रहिवाशांना लोकार्पण सोहळा , आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला , सदर कार्यक्रमास ठाणे शहर कार्यकारणी सदस्य श्री विजय भोईर , दिवा शहर अध्यक्ष श्री रोहिदास मुंडे , दिवा शहर सरचिटणीस समीर चव्हाण , युवराज यादव , दिवा शहर महिला अध्यक्षा सौ ज्योती पाटील , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत , सौ सपना भगत मधुकर पाटील , राहुल शाहू वॉर्ड अध्यक्ष नागेश पवार , वीरेंद्र गुप्ता , प्रशांत आबोंनकर , राजेंद्र आंब्रे , उदय सावंत इत्यादी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते , तसेच सृष्टी गार्डन साईप्रसाद अपार्टमेंट मधील रहिवाशी ही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. रहिवाशांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे रहिवाशांकडून शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आला..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे