0
2
0
9
7
9
कल्याण रेल्वे स्थानकात डेटोनेटर ठेवणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली. या दोघांनी 21 फेब्रुवारीला कल्याण स्थानकात डेटोनेटर ठेवल्याचा संशय आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. स्फोटक आणणाऱ्या एका फरार आरोपीचा शोध अजून सुरु आहे. जॉय डेव्हिड कालवा आणि ऋषिकेश निकुंभ अशी या दोघांची नावे आहेत. 21 फेब्रुवारीला कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके असल्याची बातमी मिळताच एकच खळबळ उडाली होती.
0
2
0
9
7
9



