Breaking
ब्रेकिंग

शिळफाटा येथे तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

 

दिनांक २६/०४/२०२४ रोजी ०८:०५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार एम.एम. सीटी जवळ, नाईस सिटीच्या समोर, मुंब्रा-पनवेल रोड, शिळफाटा, मुंब्रा. या ठिकाणी मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या एकूण-०३ दुकानांना आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट पॉवर कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह, ०१-हायराईज फायर वाहनासह व ०१-जीप वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.आगीमध्ये नुकसान झालेल्या दुकानांचा खालील तपशील दिला आहे

स्टे-वेल फार्मसी मेडिकल (मालक:- नासिर, भाडोत्री:- अब्दुल लतिफ)

सदरच्या दुकानातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, बारकोड मशीन, फ्रिजर, पंखे, मेडिकल मधील औषधांचा साठा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे.

नाईस डेकोरेट शॉप *(मालक:- सरफराज)
सदरच्या दुकानातील क्लॉथेज कॅटलॉक, लाकडी सोफा सेट, शिलाई मशीन, पंखा, सॅम्पलसाठी ठेवण्यात आलेला कपडा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे.)

गुडलक चिकन शॉप (मालक:- इलाई बक्श)
(सदरच्या दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग व साठा करून ठेलेला भुसा किरकोळ जळाला आहे.)

सदर घटनास्थळी लागलेली आग ०९:०५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे