Breaking
ब्रेकिंग

दिव्यात शिवसेनेच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर व मोफत नेत्र रोग तपासणी आणि मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

१८ नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व शेकडो नागरिकांची आरोग्य तपासनीस सहभाग…

दिवा (प्रतिनिधी) नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दिव्यातील नागरिकांची गरज लक्षात घेवून आज मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबींदु शस्रक्रिया पार पडत आहे.या शिबीराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.या शिबीरामुळे आर्थिक बाजू कमकूवत असलेल्या नागरिकांना लाभ मिळणार आहेच.परंतु अश्या शेकडो लोकांना त्यांच्या भविष्याची दृष्ट्री प्रखरतेने प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांनी केले.ते आज दिव्यातील दातिवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित नेत्र तपासणी शिबीरादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

दिवा शिवसेना शहर आणि भक्ती वेदांत हास्पीटल रिसर्च इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीर आज दातिवली येथील मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात पार पडले.या शिबीरात आत्तापर्यंत 200 जणांनी लाभ घेतला. तर 18 जणांची मोतीबींदु शस्त्रक्रिया उद्या पार पडणार आहे. शिवसेना दिवा शहर आणि भक्ती वेदांत हास्पीटल यांच्या माध्यमातून दिवा शहरातील वयोवृद्ध नागरिक यांच्यासाठी हा मोफत उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांच्या माध्यमातून आज येथे शेकडो नागरिकांची चिकीत्सा करण्यात आली.

ज्या नागरिकांना मोतीबींदूच्या आपरेशनची गरज होती,अश्या नागरिकांची नोंद घेवून स्वता भक्ती वेदांत हाँस्पीटलच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.त्यांचे आँपरेशन करुन पुन्हा इथे त्यांना सोडले जाणार आहे. अश्याप्रकारे एक स्तुत्य उपक्रम दिवा शिवसेनेच्या माध्यमातून आणि भक्ती वेदांत हाँस्पीटलच्या सहकार्याने राबवित आला आहे.

यावेळी ठाण्याचे माजी उपमहापौर आणि शिवसेना दिवा शहरप्रमुख श्री रमाकांत मढवी म्हणाले की, या शिबीराला आत्तापर्यंत पहिल्या एक तासात ५७ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.शिबीराला मिळणारा प्रतिसाद पाहता दिव्यातील बहुतांश नागरिक त्याचा लाभ घेतील.आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक शेकडो नागरिक त्यांच्या मोतीबींदूचे आँपरेशन होऊन त्यांना भविष्याची दृष्ट्री प्रखरतेने प्राप्त होईल.

या कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख श्री चरणदादा म्हात्रे, विभाग प्रमुख विनोद मढवी,विभागप्रमुख भालचंद्र भगत,शिवसेना संघटक अँड.श्री आदेश भगत, विभागप्रमुख श्री जगदिश भंडारी, बेतवडे शाख्याध्यक्ष श्री जयदिप पाटील, दातिवली शाख्याध्यक्ष निलेश म्हात्रे, मा.नगरसेविका दर्शना म्हात्रे, युवती प्रमुख साक्षी रमाकांत मढवी,मा.नगरसेवक अमर पाटील,दिपक जाधव,श्री रुपेश मढवी,शरद पाटील,शाखाप्रमुख राजेश पाटील,श्री केशव पाटील,श्री मनोज खंडागळे,श्री संतोष शिर्के,श्री मच्छिंद्र म्हात्रे,श्री मंगेश गोविलकर,प्रशांत शहा,मारुती मोरे,दिनेश लांडगे,विजय रोकडे,आनंद खिलारी,सिद्धेश थोरवे,महेश आग्रे,प्रदिप गुरव,अरुण म्हात्रे भक्ती वेदांत हाँस्पीटले संयोजक श्री डाँ. अमोल पाटील,श्री राकेश कनोजिया,मदिरासन,मंगेश बागुल,आनंदराव जगताप,रसिका पवार,प्रणाली ताम्हणकर,सारा पडियाल यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे