Breaking
ब्रेकिंग

दिवा डंपिंग डंपिंग कायमस्वरूपी बंद असून समाजकंटक डंपिंग वर बेकायदेशीर छुप्या मार्गाने करतात कचरा गाड्या खाली….. मा.नगरसेवक शैलेश पाटील आक्रमक , ठाणे महापालिका प्रशासनाला धरले धारेवर..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 9

दिवा-शीळ रोड व बंद असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर चोरून बेकायदेशीरपणे कचऱ्याच्या गाड्या टाकणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याबाबत

दिवा शहरातील नागरिकांच्या व शिवसेना दिवा शहराच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड वर्षभरापूर्वीच कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. परंतु काही दिवसांपासून दिवा शीळ रोड व बंद असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर लपून-छपून व चोरट्या मार्गाने कचऱ्याच्या गाड्या खाली केल्या जात आहेत त्यामुळे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी ठाणे पालिका प्रशासनाला धारेवर धरत अशा प्रकारे चोरून व बेकायदेशीरपणे कचऱ्याच्या गाड्या खाली करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मुंब्रा पोलिसना करून ठाणे मनपा इशारा दिला आहे.त्यांनी असे ही स्पष्ट केली की दिवा डंपिंग वर कचरा आणून काही समाजकंटक शिवसेनेच्या नावाने गैर कृत्य करत आहेत यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी सागितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे