गोवरच्या मार्गदर्शनासाठी महापालिकेची २४ तास वाँर रुम कार्यरत , लक्षणे आढळल्यास ७३०६३३०३३० या हेल्पलाईन क्रमांकावर साधावा संपर्क..
अमित जाधव - संपादक
गोवरच्या मार्गदर्शनासाठी महापालिकेची २४ तास वाँर रुम कार्यरत
– लक्षणे आढळल्यास ७३०६३३०३३० या हेल्पलाईन क्रमांकावर साधावा संपर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून संशयित गोवरच्या रुग्णांना २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रुग्णांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
लहान मुलांना गोवर सदृश्य लक्षणे आढळल्यास रूग्णांनी त्वरीत ७३०६३३०३३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर रुग्णांना २४×७ कार्यरत असलेल्या वॅार रुम मधील वैदयकिय अधिकाऱ्यांचे त्वरित मार्गदर्शन उपलब्ध होईल नजीकच्या आरोग्य केंद्रांकडून आवश्यक ती वैद्यकीय सेवा / औषधे उपलब्ध करून देण्यात येतील.सदर रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळल्यास त्याकरिता आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार करण्यात येतील.
तरी नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित ठाणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.