बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शां. कृ.पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयात साकारला शिक्षकांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळ संपन्न..

अमित जाधव-संपादक

शां. कृ.पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयात साकारला शिक्षकांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळ संपन्न

मुंबई – गणेश हिरवे

मार्च-एप्रिल 2022 मध्ये १० वी- १२ वी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे पाल्य रिया मीनाक्षी दिगंबर आढारी, सार्थ प्रांजली संजयकुमार गारळे, प्रथमेश मीनाक्षी प्रशांत पाटील, श्रेया प्रेरणा भीमराव खरमाटे, रिया तेजस्विनी अमोल निकम पाटील, गार्गी पूजा जयेश पाटील, राजवी सायली राजेश गायकवाड, मनोज पूर्वा नामदेव तडपाडे, गार्गी योगिता गणेश हिरवे,गिरीश प्रीती गणेश सूर्यवंशी (सुतार), अमेय सोनाली संदीप पांडे, भावना सुषमा गोविंद लोखंडे, संचिता सुषमा गोविंद लोखंडे, प्राजक्ता प्रतिभा राजाराम कांबळे, मयुरेश ज्योती( सुवर्णा) राजेंद्र चव्हाण, लक्ष्य सुधा सुभाष सिंग, हर्षल भारती अंकुश गळवे या सर्व पाल्यांना सदिच्छा भेटवस्तू, गुणगौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या व शाळेच्यावतीने गौरविण्यात आले. या शुभ
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सामंत सचिव सत्येन्द्र दत्तात्रय सामंत, खजिनदार श्रीम स्नेहल सामंत शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव,उपमुख्याध्यापिका ज्योती नेमाडे, पर्यवेक्षक धुळाजी दडस , सतेश शिंदे, पाटीलबुवा पाचारणे   तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कलारत्न पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक पंकज सोनवणे सर यांनी पाल्यांसाठी आकर्षक गुणगौरव प्रमाणपत्र तयार केले.सदर कार्यक्रमाचे निवेदन संजयकुमार गारळे यांनी केले. सर्व उपस्थितांचे उद्धव अमुप यांनी आभार व्यक्त केले.शेवटी राष्ट्रगीताने व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे