बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कल्याण ग्रामीण विधान सभा निवडणुक यंदा चुरशीची, दोन मा.आमदारांच्या लढाईत तिसरा बलाढ्य उमेदवार उतरतोय…?

अमित जाधव - संपादक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील  यांनी तर ठाकरेंच्या शिवसेने कडून सुभाष भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केला.

कल्याण ग्रामीण विधान सभा निवडणुकीत सूभाष भोईर हे तेही तिसऱ्यांदा आपले नशीब अजमावत आहे तर यंदाचे सक्रिय मनसेचे आमदार राजू पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात पुहा उतरले आहेत तसेच वंचीत ने देखील आपला उमेदवार विकास इंगळे यांना दिव्यातून उतरवले आहे तसेच इतर पक्षातून देखील उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत तर शिंदे गटाकडून देखील दिव्याचे उपमहापौर रमाकांत मढवी या शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे