दिव्यातील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचा १ मे रोजी प्रथम वर्धापन दिन होणार मोठया उत्साहात साजरा… श्री देवी भगवती नाट्यमंडळाच्या दशावतार प्रयोगाचे आयोजन..
अमित जाधव - संपादक
दिवा (प्रतिनिधी) दिव्यातील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित साधून बुधवार दि.१ मे रोजी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समोर,दिवा साबे गाव येथे मोठ्या दिमाखात साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे महान पौराणिक,प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत,श्री देवी भगवती नाट्यमंडळाचे दशावतार नाटक यावेळी सादर होणार आहे.यानिमित्ताने दिवावाशियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गणेश नेवगे , सरचिटणीस समीर चव्हाण , कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर यांनी केले आहे.
दिव्यातील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेला स्थापनेपासून १ मे रोजी एक वर्ष पुर्ण होत आहेत.संस्थेने आपला कार्यभार संभाळताना दिव्यात राहणार्या सिंधुदुर्ग वाशियांना एकत्रित करण्याचे महत्वाचे काम केले आहे.त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, जिल्ह्यातील नागरिकांच्या मुलांचा सत्कार करणे,त्यांना आवश्यक शैक्षणिक साहीत्य पुरविणे, सामाजिक कार्यक्रम राबविणे ,गरीबांना मदत करणे अशी अनेक कामे संस्था करीत आली आहे.
यानिमित्ताने दुसर्या वर्धापन दिनानिमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली आहे.सकाळी १०.००वाजता संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणार्या हुतात्म्यांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात येणार आहे.१२.०० वाजता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.१.०० वा.सत्यनारायण महापूजेचे आयोजन व कथावाचन, ५.०० वा.सुस्वर भजन, ६.००वा.महीलांसाठी सार्वजनिक हळदीकूंकू,७ वाजता मंगळागौर कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार, रात्रौ ८ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असे दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यातील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश नेवगे , सरचिटणीस समीर चव्हाण , कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर, प्रमुख सल्लागार गोविंद घाडीगावकर, उपाध्यक्ष सुदेश जाधव, रवी मुनूनकर यांनी केले आहे.



