फेब्रुवारी पासून मानखुर्द -ठाणे प्रवास केवळ 5 मिनटात
छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पातील मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून या उड्डाणपुलातील शेवटचा गर्डर बसविण्यात आला. आता उर्वरित कामे पूर्ण करू हा पूल *१५ फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल करण्याची* तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. हा पूल सुरू झाल्यास छेडा नगर येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा दावा करण्यात येत आहे.
त्याचवेळी महत्त्वाचे म्हणजे मानखुर्द – ठाणे अंतर केवळ पाच मिनिटात पार करणे शक्य होणार आहे.या *प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत.* यापैकी पहिला तीन मार्गिकेचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणारा आहे. दुसरा दोन मार्गिकांचा उड्डाणपूल १,२३५ मीटर लांबीचा असून तो मानखुर्द रोडपासून थेट ठाण्याला जोडण्यात येणार आहे.



