Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कल्याण येथे दोन लाखाच्या बनावट नोटांनसह तिघांना अटक….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
  1. कल्याण येथे दोन लाखाच्या बनावट नोटांनसह तिघांना अटक….♦

कल्याण : येथील एका खासगी विश्रांती गृहात छापा मारून कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा आज जप्त केल्या.या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिल्लीत आहे व पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.करण रजक (राहणार कल्याण पत्रीपूल), सुरत पुजारी राहणार (कल्याण पत्रिपुल), मोहम्मद आरिफ (रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय चलानातील २०० रुपयांच्या दोन लाख रुपयांच्या नोटा छाप्यातून पोलिसांनी जप्त केल्या. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना कल्याण पश्चिमेतील अनिल पॅलेस विश्रांती गृहात एका खोलीत तीन जण थांबले आहेत. ते बनावट नोटांचा व्यवहार करण्यासाठी आले आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक होनमाने, निरीक्षक सरोदे विशेष पथकासह अनिल विश्रांती गृहात पोहचले. त्यांनी विश्रांती गृहा भोवती सापळा रचून जेणेकरून आरोपी पळून जाता कामा नये. साध्या वेशातील एक पोलीस आरोपी बसलेल्या खोलीत पाठविण्यात आला. त्याने तीन जणांना ‘तुम्ही येथे काय करता’ अशी विचारणा केली. त्यावेळी तीन जण घाबरले. ते उलट सुलट उत्तरे देऊ लागले. त्यांनी खोलीतून पळण्याची तयारी सुरू केली. पोलिसाने वरिष्ठांना इशारा करताच एकावेळी शोध पथक खोलीत शिरले आणि तीन जणांना ताब्यात घेतले. खोलीतील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना त्यांच्या जवळ भारतीय चलनी व्यवहारातील दोन लाख रुपयांच्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या. करण हा पत्रीपुलाजवळ राहतो. तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. सुरज हा रेल्वे स्थानक भागात हमालाचे काम करतो. काही दिवस मोहम्मद पत्रीपूल भागात राहत होता. त्याची करण, सुरजशी ओळख झाली होती. या तीन जणांचा मुख्य सूत्रधार दिल्लीत आहे. तो या बनावट नोटा वितरित करण्याचे काम करतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. बनावट नोटा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये जाऊन वस्तू खरेदीच्या माध्यमांतून नागरिकांना मध्ये पसरवल्या जात होत्या,अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे पुढील तपास कल्याण महात्मा फुले पोलिस स्टेशन करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे