Breaking
ब्रेकिंग

दिवा चौकात लवकरच उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

♦दिवा शहरातील एकमेव अश्या गजबजलेल्या चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून, शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतरच या चौकात पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा हे महत्वाचे जंक्शन आहे. या जंक्शन वरून दिवस भरात लाखों प्रवाशी ये- जा करतात गेल्या काही वर्षात दिवा शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दरम्यान या भागात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्याछत्रपती शिवाजी महाराजांचा एकही भव्य पुतळा नाही. दिवा स्टेशन रोड, आगसन रोड व दिवा स्टेशनला जोडणारा शिळ दिवा रोड या तीन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या दिवा चौक येथे आवश्यक चौथरा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा मानस प्रशासनाचा आहे. लवकरच शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात येणार आहे असे ठाणे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे