Breaking
ब्रेकिंग

ठाणे महापालिका अंतर्गत दिव्यात सर्वकष स्वच्छता अभियान आले राबविण्यात…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

ठाणे..सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार यावे मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले होते त्यामुळे दिवा शहरात देखील सर्वकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले शहरातील हवा स्वच्छ राहण्यासाठी, धूलिकण कमी करणे, संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून धुवून घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

दीव्यात सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक ,राजकारणी सहभागी होते.यावेळी दिवा स्टेशन रोड ते दिवा आगासन या मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई तसेच रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले.
ठाणे महापालिकेचे मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे उपायुक्त, दिवा प्रभाग समिती चे सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली सकाळी सहा वाजता या सर्वंकष स्वच्छ्ता अभियानास प्रारंभ करण्यात आला.


या सर्वकश स्वच्छता मोहिमेत दिव्यातील शहरप्रमुख रमाकांत मढवी,उपशहर प्रमुख शैलेश पाटील,आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, अर्चना पाटील, मा.नगरसेवक दीपक जाधव , सुनिता गणेश मुंडे , मा.नगरसेवक अमर पाटील, मा.नगरसेविका दिपाली उमेश भगत व दर्शना चरणदास म्हात्रे, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, शशीकांत पाटील,भालचंद्र भगत, विनोद मढवी, युवा अधिकारी साक्षी मढवी, जगदीश भंडारी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक तसेच दिवेकर मोठ्या संख्येने रामरथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे