ठाणे महापालिका निवडणुकीत युतीला भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांचा विरोध ठाम..* *ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांचे मुख्यमंत्री यांना निवेदन..

ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक महायुतीतलढण्याची घोषणा शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांनी जाहीर केली असली तरी ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांमधून युती विरोधात सूर उमटू लागला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरी भागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन युती नकोच असा सूर लावत त्या मागची कारणही सांगितली. तसेच स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. थेट शिंदे यांच्य मतदारसंघातच युतीत नाराजीचे वारे वाहू लागल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर बंड थोपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.मागील काही महिन्यांपासून ठाण्यात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत थेट लढत होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती. स्वबळाचा नारा देत दोन्ही पक्षांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले होते. यामुळे अनेक नवखे तसेच जुने इच्छुक पदाधिकारी प्रभाग पातळीवर मोर्चेबांधणी करत होते.
दरम्यान, ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मंगळवारी ठाण्यात झालेल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात महायुतीचा नारा देण्यात आला. असे असले तरी, ठाण्यातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व मंडळ अद्यक्ष यांच्या कडून युतीला तीव्र विरोध होऊ लागला आहे.
शिवसेनेकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळेच महायुती नको, असे पदाधिकारी म्हणाले. आम्हाला युती नको असून, भाजप ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्णतः सक्षम आहे, असा ठाम दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.


