Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांना वापर परवाना द्या-जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे व नजीब मुल्ला यांचा महापौरांकडे प्रस्ताव…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांना वापर परवाना द्या-जेष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे व नजीब मुल्ला यांचा महापौरांकडे प्रस्ताव…

ठाणे : ठाणे शहरातील अधिकृत बांधकामांना वापर परवाना द्या अशी मागणी जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे शहरात गेल्या अनेक वर्षापासून झालेले अनधिकृत बांधकाम व त्यातून होणा-या दुर्घटना तसेच जिवीत हानी होऊ नये म्हणून यावर कायमची उपाययोजना व्हावी याकरीता ठाणे शहराचे पालकमंत्री तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासदार, आमदार महापौर व सभागृह यांच्या वतीने अनधिकृत बांधकामांना समाविष्ट करुन राज्य शासनाच्या मान्यतेने एखादी योजना असावी या संकल्पनेतून समुह विकास योजनेला ठाणे महानगरपालिका तसेच राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे यापूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना अधिकृतचा दर्जा देऊन या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे असे समजते.
ठाणे शहरातील बांधकाम नियमावली (DCR) प्रमाणे बांधकामे होऊन सुध्दा काही नियमांचा अडथळा येत असल्यामुळे तसेच आर्थिक बोजा येत असल्यामुळे बरचशा हौसिंग सोसायटींना अद्याप वापर परवाना मिळालेला नाही. मध्यंतरीच्या कालावधीत सभागृहामध्ये अभय योजना मंजुर करुन सुध्दा त्यास चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तरी जर बांधकाम नियमावली (DCR) प्रमाणे बांधकाम झाले असेल व चटई निर्देशांक (E.S.L.)चे उल्लंघन होत नसेल तर, प्रती कुटुंब रु.५०००/- (रुपये पाच हजार मात्र ) आकारुन त्यांना वापर परवाना देण्याबाबतच्या या प्रस्तावाच्या सुचनेस ना.सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात यावी अशी मागणी जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन देऊन केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे