ब्रेकिंग
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हरित सेनेने प्रभागात विविध ठिकाणी लावली शेकडो झाडे….
अमित जाधव - प्रतिनिधी
0
2
0
9
7
8
नाशिक- लासलगाव – राज्य शासनाने संपूर्ण राज्यात ३३ कोटी वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प सोडला आहे. या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपणामागची तळमळ खरी मानली तरी, या उपक्रमाच्या कृतिशक्यतेकडे पाहणेही आवश्यक आहे

जागतिक पर्यावरण दिवस, जागतिक जैवविविधता दिवस, जागतिक वसुंधरा दिवस, जागतिक जल दिन, जागतिक वन दिवस हे सगळे दिवस आपण सार्वजनिक संस्थांमधून, शाळांमधून हिरिरीने साजरे करतो. त्यानिमित्ताने काही नेम करतो, काही प्रतिज्ञा करतो, काही उपक्रम राबवतो. काहींचा यामागचा उद्देश प्रामाणिक असतो.

यापैकीच एक उपक्रम म्हणजे- वृक्षारोपण!
असाच उपक्रम नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे हरीत सेनेने हाती घेत अनेक शाळा व विभागातील मोकल्याजागे मध्ये शेकडो झाडे त्यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लावली.
अमृत नगर, सुमित नगर, व संस्कार इग्रजी मध्यम शाळा इत्यादी येथे उपक्रम राबविण्यात आला. हरित सेने च्या ,संजय बिरार,निलेश वर्मा,ऋषिकेश जोशी,डॉ. रुपेश गांगुर्डे,शेखर शिंदे,राजुबाबा होळकर
तर महिला मंडळ मध्ये सो कविता बिरार,वैशाली भावसार ,भरती सोनवणे,रोहिणी जाधव,फरीदा काजी ,स्वाती रायते ,सना शेख गोरे मावशी सोनम बांगर अनिल बांगर,उषाताई कुमावत यांनी हा उपक्रम हाती घेत प्रसंगी,आदी पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
0
2
0
9
7
8



