Breaking
ब्रेकिंग

2000 रू. नोट चलनातून रद्द,पण यासाठी नागरिकांनी काय करावे संपूर्ण माहिती….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

: 2000 रुपयांची नोट (Rs 2000 notes) चलनातून रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे. मात्र, 2000 रुपयांच्या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, अशा नागरिकांना आरबीआयने नोटा बदलून देण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्याशिवाय, बँकांनाही ग्राहकांना एटीएम अथवा इतर मार्गाने 2000 रुपयांची नोट न देण्याचेही निर्देश दिले आहेत.

ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरबीआयने या नागरिकांसाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरीक 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

2. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.

3. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

5. 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

6. आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.

7. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही
2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली
दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे