ब्रेकिंग
कल्याण बिस्किटमधून गुंगीचे औषध लुटमार करणाऱ्या भामट्या चोरास अखेर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केलं अटक…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
रेल्वे प्रवाशाशी सलगी करून त्याला बोलण्यात गुंतवून प्रवाशाला बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास द्यायचे. प्रवासी गुंगी येऊन पडला की त्याच्या जवळील किमती ऐवज किंवा त्याच्या पिशवीतील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. रामसुरत रामराज पाल (४६) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो सध्या भिवंडी येथे वास्तव्यास आहे. भिवंडीत राहून तो कल्याण ते मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल चोरण्याचे धंदे करत होता.असे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे
0
2
0
9
7
4



