आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंग
दिव्यात माणूस मेल्यावर ही अंत्यविधी साठी पैसे द्यावे लागतात, ठाणे महापालिकेची मोफत दहन विधी योजना अजून कागदावरच..!
अमित जाधव - संपादक

0
2
4
3
6
5
दिवा – ठाणे महानगर पालिकेचा अर्थसंकल्पात .दिवेकरांना मरणोत्तर मोफत दहन विधी योजना दोन वर्षांपासून रखडलेली योजना ही योजना अमलात केव्हा येईल दोन कोटीच्या तरतुदींचे कायझाले..? लोकप्रतिनिधी,महायुतीचे नगरसेवक आवाज उठवणार का..? असा गंभीर प्रश्न दिवा भाजप मंडळाचे अद्यक्ष चे सचिन भोईर यांनी करत पुन्हा एकदा त्यांनी याकडे ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांनी या विषयावर प्रामुख्याने हात घालून लवकरात लवकर दिव्यात मोफत अंत्यविधी ची योजना अमलात आणून समस्त दिवेकरांच्या हिताचे कार्य करतील असे मला वाटतंय 2023 पासून करत आलेलो पाठपुरावा आज ही आजही प्रतीक्षेत आहे ही मोठी शोकांतिका आहे असे यावेळी सचिन भोईर यांनी बोलताना स्पष्ट केल आहे
0
2
4
3
6
5



