
राज्यातील महापालिका निवडणुका गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणेसह राज्यातील अनेक महापालिका निवडणूक होणार आहे. पण या निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. या निकालानंतर तीन महिन्याचा कालावधी तयारीसाठी लागू शकतो. म्हणजे या निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे