सम्यक समता मंडळ (रजि.) आणि महिला मंडळ यांच्या वतीने वर्षावास सांगता समारंभ संपन्न, अशोका विजयादशमी, ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम उत्साहात…
अमित जाधव - संपादक

दिवा शहर सम्यक समता मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मंडळाचे अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव यांच्या निवासस्थानी वर्षावास सांगता समारंभ , अशोका विजयादशमी आणि ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा तिहेरी कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि मंगलमय पवित्र वातावरणात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमात तथागत बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण चर्मकार समाजातून बौद्ध धम्माची दिक्षा ज्यांनी घेतली अशा कु. राहुल शिंदे यांच्या मातोश्री आयुनी. आशा शिंदे यांच्या हस्ते तर महिला जेष्ठ सल्लागार आयुनी. अपर्णा सकपाळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर महिला कार्यकर्त्या कार्यशील सदस्य आयुनी. रेखा अडसुळे,सुनंदा पवार, चंद्रकला जाधव, कलावती रणझुंजारे, शुभ्रा जाधव,राजेश्री नारिंगीकर, मेघा कासारे, संध्या न्यायनीत, सचिव आयुनी. विशाखा हाटे यांच्या हस्ते प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची उत्कृष्ठ सजावटिचे नियोजन महिला मंडळ अध्यक्षा आयुनी. अनुष्का अडसुळे यांनी केले. कार्यक्रमाचे विधी संचालन आणि सूत्र संचालन आपल्या सुमधुर वाणीतून मंडळाचे महासचिव आयु. नितीन रिंगणेकर यांनी लिलया पार पाडले. कार्यक्रमात अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव यांनी बुद्ध गुणविशेष या विषयावर अतिशय सोप्या भाषेत उपस्थित उपासक आणि उपासिका धम्मदेसना दिली. तर युवा व्याख्याते आयु. संभाजी कदम यांनी अतिशय मार्मिक शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बोद्ध धम्माचे निष्ठावान उपासक बना आणि आपली ओळख बोद्ध आहे , हे सर्वाना सांगण्याचे आवाहन केले. पहाडी आवाजाचे सुप्रसिद्ध गायक आयु. गंगाधर गायकवाड यांनी रमाई गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सार्वजिनक जयंती उत्सव कमिटीचे महासचिव आयु. विजय पवार यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले व उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सार्वजिनक जयंती उत्सव कमिटीचे प्रमुख संघटक आयु. बालाजी कदम यांनी देखील उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सांची क्लिनिक चे डॉ. देवेंद्र कांबळे यांनी प्रभावी वक्तृत्व करीत निभिड जंगले तुडवीत आलो, रथ समतेचा असा आणिला सांभाळूनि न्याहो,,,
आणि गट तटात विभागलेल्या आपल्या समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. तदनंतर मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते आयु. देवेंद्र बनसोडे यांची कन्या कु. विदिशा बनसोडे हिने हाँग येथील ४६ राष्ट्रांच्या वुशो किक बॉक्सिंग या प्रकारात आपल्या भारत देशाला सिल्व्हर व ब्रॉंझ मेडल मिळवून त्याबद्दल तिचा आणि तिच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध मान्यवरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास युवा उद्योजक विनोद भालेराव, बापू भोसले, अतिश सर्वदे, गणेश पवार, महाबळे सर, प्रदीप सकपाळ आदी कार्यकतें आवर्जून उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमास विद्युत रोषणाई आणि उत्कृष्ठ अशी साऊंड व्यवस्था रत्नदीप डेकॉरटेरचे मालक धम्मबंधु आयु. अरुण जाधव यांनी अतिशय चोख पार पाडली. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष आयु. अभिषेक अशोक जाधव यांनी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केले. तर मंडळाचे उपाध्यक्ष आयु. संजय कांबळे, कार्याध्यक्ष आयु. मंगेश कदम, सह सचिव सुशांत अडसुळे, खजिनदार सतीश कळासरे, हिशोब तपासनीस सुशील धनावडे, प्रमुख संघटक सुमित पवार, प्रमुख सल्लागार मारुती डहाणे, भास्कर चव्हाण, अविनाश गायकवाड चंद्रसेन जाधव आदी कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमात ५ मिनिटे विपश्यना मेडिटेशन व मंगल मैत्री सबका मंगल हो घेण्यात आले. कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वी पणे पार पडला.*