लोकलमधून पडल्याने “जगन जगांडे” यांनी गमावले दोन्ही पाय,खासदार “श्रीकांत शिंदे” यांनी दिला मदतीचा हात..०५ लाखांची केली आर्थिक मदत..तसेच कृत्रिम पाय बसवण्यासाठी दिले ०२ लाख रुपये..!
अमित जाधव - संपादक

ठाणे -गेल्यावर्षी लोकलने कल्याण येथून मुंबईकडे कामावर जाताना जगन जंगाडे या युवकाचा अपघात झाला होता. लोकलमधून पडल्याने या युवकाला दोन्ही पाय गमवावे लागले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घटनेची गांभीर्यता पाहून युवकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सोबतच श्रीकांत शिंदे यांनीही त्याच्यासाठी जे काही करणे शक्य होईल ते करण्याचे आश्वासन दिले होते. या युवकावर उपचार करत असलेले हायलँड हॉस्पिटल बिलाचा कुठलाही तगादा नातेवाईकांमागे लावणार नाही याचीही काळजी घेतली.
काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी जन्मदिनी अपघातात पाय गमावलेल्या जगन जंगाडे या युवकाला ५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. सोबतच कृत्रिम पाय बसविण्यासाठी आणखी २ लाख रुपये देण्याची ग्वाहीसुध्दा दिली आहे. तसेच भविष्यात उदरनिर्वाहासाठी काय करणार याची सर्व विचारपूस करून रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, हायलँड हॉस्पिटलचे गोपाल सिंग सर, हायलँड हॉस्पिटल ऍडमिन भाविका शर्मा, युवराज काकडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे भरत गोपाळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कक्ष प्रमुख अजय महाजन आणि वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.